Loan Recovery: लोन वसुली करणारे एजेंट धमकी देतात? तुम्हालाही आहेत ‘हे’ अधिकार; करा सामना…

Ahmednagarlive24 office
Published:

Loan Recovery : मध्यमवर्गीय किंवा इतर लोक हे व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा एखाद्या महत्वाच्या कामासाठी वेगवेगळ्या मार्गातून कर्ज मिळवत असतात. व हे कर्ज ते हळूहळू हफ्त्यास्वरूपात परत करत असतात.

मात्र काही वेळा कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करणे एखाद्याला अवघड जाते. अशा वेळी आणि योग्य वेळी आपण ते परत करू शकले नाही तर वसुली एजेंट्स वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्याकडून कर्ज वसुल करण्याचा प्रयत्न करतात.

मात्र अशा परिस्थितीत आपले अधिकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. खूपच अडचणीच्या कामांसाठी आपल्याला बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं. परंतु काही वेळा आपल्याला असणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे ते वेळेवर रिटर्न करता येत नाही.

या वेळी कर्जासाठी सुरक्षा म्हणून ठेवलेली आपली मालमत्ताही आपल्याला गमवावी लागते. या वेळी कर्जासाठी गहाण म्हणून ठेवलेली मालमत्ता जप्त करण्याचा संबंधित बँकेला कायदेशीर अधिकारही असतो. मात्र यावेळी ग्राहकाचे काय अधिकार असतात? याविषयीच जाणून घ्या.

वसुली करणारे एजंट आपल्याला धमकावू शकत नाहीत…

आपण बँकेकडून कर्ज घेऊन घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नसाल तर बँक आपल्याकडून रिकव्हरी एजंट मार्फत आपण घेतलेले पैसे वसूल करते. बरेचवेळा वसुली एजंट आपल्याला धमकावून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु वसुली एजंटना ग्राहकांना धमकावण्याचा अथवा त्यांच्या सोबत गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही.

बँकेच्या नियमानुसार वसूली एजंट हे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच ते कर्जदाराच्या घरी जाऊ शकतात. जर समजा वसुली एजंट हे ग्राहकांशी गैरवर्तन करत असतील तर ग्राहक त्यांच्या विरोधात बँकेकडे तक्रार करू शकतात. बँकेकडून त्यावर उपाय न झाल्यास बँकिंग लोकपालाकडे आपल्याला अपील करता येते.

आपण घेतलेले कर्ज हे वसूल करण्यासाठी कोणतीही सूचना दिल्याशिवाय कोणताही सावकार आपल्या संपत्तीचा ताबा घेऊ शकत नाही. ज्यावेळी एखादा कस्टमर दिवसांपर्यंत कर्जाचा हप्ता भरत नाही, तेव्हा संबंधित खाते नॉन-परफॉर्मिंग aset मध्ये टाकले जाते. मात्र हे करत असताना कर्ज घेणाऱ्या थकबाकीदाराला किमान 60 दिवसांची नोटीस द्यावी लागते.

नोटीस दिल्यानंतर सुद्धा दिलेल्या मुदतीमध्ये कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही, तर त्याची मालमत्ता संबधित बँकेकडून ताब्यात घेतली जाऊ शकते. त्याचबरोबर मालमत्तेच्या लिलावाच्या सुमारे 30 दिवस आधी त्याला सार्वजनिक नोटीस जारी करावी लागेल.

कर्जदार मालमत्तेच्या लिलाव किंमतीला देऊ शकतो आव्हान

कर्ज वसूल करत असताना कोणताही सावकार हा त्याच्या डिफॉल्ट ग्राहकांच्या मालमत्तेचा लिलाव जाहीर करण्यापूर्वी त्या मालमत्तेचे मूल्य दर्शवणारी नोटीस जारी करतो. या नोटीस मध्ये रिझर्व्ह किंमत, लिलाव करण्याची तारीख आणि वेळ सुध्दा दिसेली असते.

अशा स्थितीत कस्टमर ला आपल्या वस्तूची किंमत कमी झाली आहे असे वाटत असल्यास तो लिलावाला आव्हान देऊ शकतो. त्याच वेळी,ग्राहकाच्या वस्तूचा लिलाव झाल्यानंतरही, कर्जाची वसुली झाल्यानंतर उर्वरित रक्कम मिळविण्याचा पूर्ण अधिकार हा ग्राहकांना आहे. अशा प्रकारे या सर्व गोष्टी तुम्हाला माहित झाल्यानंतर वेळ आलीच तर लोन वसुली करणारे एजेंटसमोर तुम्ही तुमचे अधिकार दाखवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe