शेतशिवाराला निळवंडे कालव्यांद्वारे पाणी मिळावे ! खा. लोखंडें म्हणाले…

Published on -

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त करुले गावापासून अवघ्या एक कि. मी. अंतरावरून निळवंडे धरण प्रकल्पाचा कालवा जात आहे. मात्र, करुले गावाचा शिवार निळवंडेच्या पाण्यापासून वंचित आहे.

त्यामुळे पाटचारी अथवा उपसा सिंचन योजनेद्वारे निळवंडे कालव्याच्या पाण्याने करुले शिवारातील पाझर तलाव भरून द्यावेत, अशी मागणी करुले येथील शेतकरी व ग्रामस्थांनी खासदार सदाशिव लोखंडे यांची शिर्डी येथे भेट घेत केल्या. याप्रश्नी खासदार लोखंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

करुले गावाच्या शेतशिवाराला निळवंडे कालव्यांद्वारे पाणी मिळावे, याप्रश्नी करुले येथील शेतकरी व ग्रामस्थांनी खासदार सदाशिव लोखंडे यांची शिर्डी येथे भेट घेतली. याप्रसंगी राजेंद्र आहेर, दत्तू आहेर, संजय आहेर, जालिंदर आखाडे, तुकाराम आहेर, काशिनाथ बोऱ्हाडे, योगेश आहेर, बालचंद आखाडे, राजेंद्र कोल्हे, रेवणनाथ आखाडे उपस्थित होते.

याबाबत निळवंडेचे धरणाचे पाणी मिळावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन खासदार सदाशिव लोखंडे यांना करुले ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले. करुले गावचा शेतशिवार निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून वंचित आहे.

निळवंडे कालवा करुले गावापासून अवघ्या एक कि. मी. अंतरावरून आहे. करुले हे गाव दुष्काळी पट्टयात असून शेती व पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे.

त्यामुळे पाटचारी करून अथवा उपसा सिंचन योजना राबवून करुले गावातील पाझर तलाव भरून मिळाल्यास करुले गावातील पिण्याचा पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटु शकेल, असे निवेदनात नमूद केले आहे. आमच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, असे साकडे शेतकरी व ग्रामस्थांनी खासदार लोखंडे यांना घातले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe