Ganja cultivation : सातपुडा बनतोय गांजाचा डोंगर ! ६५० रुपयांच्या बियाणांत लाखोंचा गांजा, पाण्यासाठी थेट वरपर्यंत ठिबक, दहशत अशी की तेथे जायला पोलिसांनाच घाम फुटतो…

Ahmednagarlive24 office
Published:

गांजा विक्री, त्याची शेती करणे हा गुन्हाच. परंतु समोर आलेलं एक भयाण वास्तव जर तुम्ही पाहिलं तर थक्क व्हाल. जळगाव, धुळे च्या बॉण्डरीवरील काही तालुक्यात सातपुडा पर्वतरांगांच्या वर गांजाची शेती केली जात आहे.

थोडी तिडकी नव्हे तर लाखोंची उलाढाल करणारी शेती. या वर डोंगरावर वरपर्यंत ठिबक नेले जाते. त्याद्वारे पाणी दिले जाते. येथे या लोककनही दहशत एवढी आहे की, पोलिसही वर जायला घाबरतात. या डोंगरांवर, गुन्हेगार, दलालांचे साम्राज्य आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

हा भाग झालाय हॉटस्पॉट :- धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडे, खांडरागड परिसर, भोईटी, सत्रासेन, उमर्टी, वैजापूर, मध्य प्रदेशातील बलवाडी, गेरुघाटी, पार उमर्टी , लाकड्या हनुमान, रोहिणी, महादेव दोंदवाडे ही गांजा पिकवण्याचे हॉट स्पॉट आहेत.

तसेच जळगाव मधील चोपडा तालुक्यातील पर्वतरांगेत देखील याची शेती केली जाते. डोंगर आणि पर्वतरांगावरच्या सपाट जागांवर जवळचे शेतकरी शेती करतात. उंच वाढणाऱ्या (उदा. मका, ज्वारी, बाजरी, कापूस) पिकांमध्ये लपवून गांजा पेरला जातो.

एक तर ती जागा अशी असते की सामान्य माणूस तिकडे सहजासहजी फिरकत नाही. फिरकलाच तर जोपर्यंत गांजाला फुले लागत नाहीत तोपर्यंत त्याचा वास येत नाही. त्यामुळे आत गांजा लागवड केली आहे हे कोणाला कळत नाही.

६५० रुपयांत ४ लाखांचे उत्पन्न :- ६५० रुपयांत साधारण ४०० ग्राम गांजाचे बी मिळते. यात साधारण २० किलो गांजा निघतो. हा गांजा २० ते २५ हजार रुपये किलोप्रमाणे विकला जातो. म्हणजेच जवळपास ४ लाखांचे उत्पन्न काढले जाते.

मे महिन्यात किंवा त्यानंतर गांजाची लागवड केली जाते. एक एकर शेतात गांजा लावण्यासाठी ४०० ग्रॅम बी लागते. त्यापासून पीक चांगले आले तर साधारण २० किलो गांजा मिळतो. गांजाचा दर्प आणि कोरडेपणा यावर त्याची किंमत ठरते असे एका दैनिकाच्या अहवालात म्हटले आहे.

पोलिसांनाही मोठा धोका :-जर या भागात जास्त प्रमाणात पीक लागवड असेल तरच कधीतरी पोलिस कारवाईचा धोका घेतात. अन्यथा दुर्लक्षही केले जाते. यांचे कारण इतक्या दुर्गम भागात कारवाई करणे जीवावरच्या जोखीमेपेक्षा कमी नाही. येथे जाणे म्हणजे बऱ्याचदा जीवावर बेताने असाही अर्थ आहे.

ठिबक सिंचन :-गांजाची झाडे चार ते सात फूट उंच वाढतात. हे पीक पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे उंच डोंगरावरही ठिबकने पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. ठिबकद्वारे थेट या डोंगरावर गांजाला पाणी दिले जाते. एका दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

दलालांमार्फत होते तस्करी :- लाकड्या हनुमान शिवारापासून पुढे रोहिणी व उत्तरेकडून २५ कि.मी. वर बलवाडी – सेंधवा तसेच वरला व उमर्टीमार्गे गांजा मध्य प्रदेशात जातो. रोहिणीपासून सुमारे ४० किलोमीटरवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा-यावल मार्गे जळगाव व तेथून इतरत्र गांजा नेला जातो.

लाकड्या हनुमानपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावरील सुळे गावाजवळून एक रस्ता मध्य प्रदेशात तर दुसरा अनेर वनक्षेत्रातून महामार्ग टाळत शिरपूरकडे जातो. तेथून इतर जिल्ह्यात नेला जातो असेही या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe