Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वातावरण चांगलेच गरम झाले आहे. एकीकडे उष्णतेची हिट तर दुसरीकडे निवडणुकांचा ज्वर. त्यामुळे वातावरण चांगलेच राजकीय झाले आहे. परंतु ही रणधुमाळी एकीकडे सुरु असली तरी दुसरीकडे मोठे जलसंकट उभे येऊन ठाकले आहे.
मोठमोठे प्रकल्प वाटाण्याच्या मार्गावर असल्याने अहमदनगर महापालिकेसह जिल्ह्यातील अनेक शहरांच्या पाणी पुरवठ्यात जलसंपदा विभागाने 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अवघा 39 टक्के पाणीसाठा व जिल्ह्यात पाणीबाणी
अहमदनगरमधील मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ३१ जुलैपर्यंत धरणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे. त्यामुळे बिगर सिंचनात २० टक्के कपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतलाय. या निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासूनच होणार असल्याने पाणीबाणी निश्चित मनाली जात आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील मोठ्या शहरात अपुऱ्या पाणीपुरवठ्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाला पाण्याचे नियोजन करण्यासाठी कंबर कसावे लागणार आहे. या पाणीबाणीचा फटका मुळा धरणावर अवलंबून असलेल्या नगर महापालिकेसह देवळाली प्रवरा, बारागाव, राहुरी, नांदूर, सोनई, शनिशिंगणापूर, बुऱ्हाणनगर, मिरी-तिसगाव या प्रादेशिक पाणीयोजनांना बसेल असे चित्र आहे. समन्यायी पाणीवाटप धोरणाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे पाणीबाणी उद्भवली असा एक मतप्रवाह आहे.
भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणातून सुमारे पाच टीसीएम पाणी जानेवारीमध्ये जायकवाडीला सोडले गेले होते. त्यातच आता उष्णतेने होणारे बाष्पीभवन यामुळे पाणीसाठे 39 टक्क्यांवर आले आहेत. आगामी दिवसात पाऊस कधी पडेल याची परफेक्ट खात्री नसल्याने जलसंपदा विभागाने वर्षिक कोट्यात 20 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या धारांत किती पाणीसाठा? (दशलक्ष घनफूटमध्ये)
भंडारदरा धरणात 5042 , निळवंडे धरणात 1255, मुळा धरणात 12550, आढळा धरणात 370, मांडओहोळ धरणात 45, पारगाव घाटशीळ धरणात कोरडे, सीना धरणात 686, खैरी धरणात 90, विसापूर धरणात 243 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.