महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये तुरीचा ‘हा’ वाण ठरतोय लोकप्रिय ! एकरी 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने गोदावरी हा तुरीचा एक नवा वाण विकसित केला आहे आणि या जातीची लागवड करून महाराष्ट्रातील शेतकरी बांधव चांगले उत्पादन या ठिकाणी मिळवताना दिसत आहेत. मागील दोन-तीन वर्षापासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये या वाणाने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी क्रांती केलेली आहे.

Tejas B Shelar
Published:
Tur Farming

Tur Farming : तुर हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक असून या पिकाचे राज्यातील मराठवाडा विदर्भामध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. तुरीच्या विविध जाती कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांसाठी तुरीचा एक नवा वाण विकसित केला आहे.

कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून अलीकडेच विकसित करण्यात आलेला हा वाण राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा फायद्याचा ठरत असून यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने गोदावरी हा तुरीचा एक नवा वाण विकसित केला आहे आणि या जातीची लागवड करून महाराष्ट्रातील शेतकरी बांधव चांगले उत्पादन या ठिकाणी मिळवताना दिसत आहेत.

मागील दोन-तीन वर्षापासून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये या वाणाने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी क्रांती केलेली आहे. या जातीची लागवड करून शेतकरी बांधव एकरी एक लाख रुपयांपर्यंतची कमाई करत आहेत.

स्वतः शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच हा आकडा सांगितला जात असून यामुळे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची छाती गर्वाने फुगून आलेली आहे. आपण केलेल्या संशोधनाचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा होतोयं हे पाहून कृषी शास्त्रज्ञ खूपच उत्सुक आणि आनंदी आहेत.

विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला गोदावरी हा वाण चक्क ऊस पिकाला पर्यायी पीक म्हणून लावला जात असून शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होत असल्याने आगामी काळात या जातीचे लागवडीखालील क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता देखील या निमित्ताने व्यक्त होत आहे.

या जातीची लागवड कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही भागांमध्ये केले जाऊ शकते आणि दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये या जातीपासून चांगले उत्पादन या ठिकाणी मिळवता येणे शक्य आहे. गोदावरी या वाणाच्या शेंगांमध्ये चार ते पाच दाणे असून मर रोगास बळी पडत नाहीत, ही या जातीची सर्वात मोठी विशेषता.

महत्त्वाची बाब अशी की या जातीची लागवड करून शेतकरी बांधव कोरडवाहू क्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल आणि ठिबक सिंचनवर लागवड केल्यास जवळपास १८ क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवू शकतात. विशेष म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने कमी क्षेत्रावर लागवड केली तर त्यास कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल उतारा मिळतो असा दावा होतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe