Pune Expressway News : भारतात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. रस्ते विकासाच्या प्रकल्पांमुळे देशातील रस्ते कनेक्टिव्हिटी फारच मजबूत झालेली आहे. जिल्ह्या-जिल्ह्यांमधील अंतर कमी झाले असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय. भारतमाला परियोजने अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून देशभरात आत्तापर्यंत हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग प्रकल्प विकसित करण्यात आले आहेत.
गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात देशात मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून महाराष्ट्रातही अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लागली आहेत. अशातच आता राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे ते बेंगलोर दरम्यान नवा महामार्ग तयार केला जाणार असून यामुळे प्रवासाचा वेळ हा निम्म्यावर येणार आहे.
हा महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडेल आणि यामुळे या दोन्ही राज्यांमधील नागरिकांना फायदा होणार आहे. या दोन्ही राज्यांचा एकात्मिक विकास या महामार्ग प्रकल्पामुळे साध्य होईल असा विश्वास व्यक्त होतोय.
कृषी पर्यटन शिक्षण अध्यात्म आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांना या महामार्ग प्रकल्पाचा फायदा होणार आहे. आता आपण हा नवा एक्सप्रेस वे नेमका कसा राहणार, याचा रूट कसा राहील या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
कसा राहणार नवा महामार्ग
पुणे ते बेंगलोर दरम्यान विकसित होणारा हा नवीन महामार्ग 700 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील तीन आणि कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांना जोडणार आहे. राज्यातील सांगली, सातारा आणि पुणे या तीन जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
सध्या पुणे ते बेंगलोर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 15 तासांचा वेळ लागतोय पण जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास कालावधी सात तासांवर येईल. या प्रकल्पामुळे मुंबई ते बेंगलोर हा प्रवास देखील वेगवान होणार आहे.
हा एक आठ पदरी महामार्ग राहणार असून यासाठी 50000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा खर्च केला जाईल. या महामार्गावर वाहने 120 km प्रती तास या वेगाने धावतील अन यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल.
हा महामार्ग दोन्ही शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करणार आहे परिणामी इंधनाच्या खर्चातही बचत होणार आहे. सध्या या महामार्ग प्रकल्पाचा डीपीआर म्हणजेच तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे.
जेव्हा हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होईल त्यानंतर या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. भूसंपादन झाल्यानंतर मग टेंडर प्रक्रिया होईल आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.