राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च 2025 अखेरीस मिळणार सातवा वेतन आयोगाचा शेवटचा हप्ता!

राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकाचा शेवटचा हप्ता मिळाला असल्याने आपल्यालाही हा हप्ता लवकरात लवकर मिळायला हवा अशी मागणी नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. यानुसार आता या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा शेवटचा हप्ता येत्या काही दिवसांनी दिला जाणार आहे.

Tejas B Shelar
Published:
7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून आता आठवा वेतन आयोगाची मागणी केली जात आहे. केंद्रातील मोदी सरकार फेब्रुवारी 2025 मध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाची घोषणा करणार अशा चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

अशातच आता नाशिक महानगरपालिका आस्थापनावरील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सातवा वेतन आयोगाच्या वेतन फरकाचा शेवटचा हप्ता मार्च 2025 अखेर दिला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

यासाठी 60 कोटी रुपयांची गरज असून याची तरतूद येत्या काही दिवसांनी होईल असे म्हटले जात आहे. मंडळी, नाशिक महापालिका आस्थापनावरील कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतील कायम अधिकारी – कर्मचाऱ्यांना तसेच सेवानिवृत्तांना दि. १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलाय. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 2021 मध्ये हा वेतन आयोग लागू करण्यात आला यामुळे १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीचा वेतन आयोगाचा फरक पाच समान हप्त्यांत अदा करण्याचा निर्णय झाला.

त्यानुसार आतापर्यंत आस्थापनावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना एकूण चार हप्ते देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आता पाचवा हप्ता मार्च 2025 अखेरीस संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी समोर आली असून यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

खरे तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना गेल्यावर्षी सातवा वेतन आयोगा अंतर्गत वेतन फरकाचा शेवटचा म्हणजेच पाचवा हप्ता गेल्या वर्षी अदा करण्यात आला.

राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकाचा शेवटचा हप्ता मिळाला असल्याने आपल्यालाही हा हप्ता लवकरात लवकर मिळायला हवा अशी मागणी नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. यानुसार आता या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा शेवटचा हप्ता येत्या काही दिवसांनी दिला जाणार आहे.

यासाठी 60 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार असून याची तरतूद अंदाजपत्रकात नसल्याने त्यामुळे आता महापालिकेच्या लेखा विभागाकडून सुधारित अंदाजपत्रक तयार केले जाणार असून यामध्ये 60 कोटी रुपयांची तरतूद होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe