उन्हाळी मका लागवडीचा प्लॅन आहे का? मग मक्याचे ‘हे’ वाण निवडा, मिळणार विक्रमी उत्पादन

मान्सून काळात झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा उन्हाळी हंगामातील पीक लागवडीखालील क्षेत्र वाढेल असे म्हटले जात आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात अनेक जण मक्याच्या लागवडीचा प्लॅन बनवत आहे. तुमचाही असाच प्लॅन असेल उन्हाळी हंगाम 2025 मध्ये तुम्हाला मका लागवड करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Maize Farming

Maize Farming : 2024 च्या मान्सून मध्ये महाराष्ट्रात चांगला समाधानकारक पाऊस झाला. जून ते सप्टेंबर 2024 या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. काही ठिकाणी अक्षरशा अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते पण आता या पावसाचा उन्हाळी हंगामातील पिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

मान्सून काळात झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा उन्हाळी हंगामातील पीक लागवडीखालील क्षेत्र वाढेल असे म्हटले जात आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात अनेक जण मक्याच्या लागवडीचा प्लॅन बनवत आहे. तुमचाही असाच प्लॅन असेल उन्हाळी हंगाम 2025 मध्ये तुम्हाला मका लागवड करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

कारण की आज आपण उन्हाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त मक्याच्या एका सुधारित जातीची माहिती पाहणार आहोत. या सुधारित जातीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातून मक्याचे चांगले दर्जेदार उत्पादन मिळणार आहे. मंडळी मका हे असे पीक आहे ज्याची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामांमध्ये लागवड होते.

उन्हाळी हंगामात मका लागवड करायची असेल तर 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा दीड महिन्यांचा काळ सर्वाधिक फायद्याचा ठरतो. उन्हाळी हंगामातील मका लागवडीसाठी हा काळ विशेष अनुकूल असतो. या काळात मक्याची पेरणी झाली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.

उन्हाळी हंगामात मका पेरणी करण्यासाठी कोणतं बियाणं वापरणार? कृषी क्षेत्रातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधव या हंगामात पायोनियर सीड्सचे पी-1899 या वाणाची पेरणी करू शकतात. या जातीची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.

P-1899 ही पायोनियर सीड्सने तयार केलेली संकरित मक्याची जात आहे. हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूपचं लोकप्रिय आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये याची लागवड पाहायला मिळते. या जातीमध्ये, एका रोपामध्ये दोन कोब्स सहज तयार होतात. विशेष म्हणजे दोन्ही भुट्टे पूर्णपणे दाण्यांनी भरले जातात.

मक्याची ही जात 90 ते 100 दिवसात परिपक्व होते. या जातीपासून प्रति एकर 40 ते 45 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. योग्य नियोजन केले तर उत्पादनाचा हा आकडा 50 क्विंटल पर्यंत पोहोचू शकतो असा दावा केला जात आहे. जर तुम्ही मक्याचा हा वाण निवडला तर एकरी सात ते आठ किलोग्रॅम एवढे बियाणे तुम्ही वापरायला हवे. जानेवारीमध्ये याची पेरणी केली तर साधारणतः एप्रिल महिन्यात याचे पीक तयार होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe