file photo

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलाच्या दिशेने गोळीबार करून त्याच्या हातातील सुमारे पैशांची बॅग लांबविल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घडली होती.

या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान याप्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सदर पैशाची बॅग जवळच काट्यात आढळून आली आहे.

यानंतर सदरील पैसे असलेली बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा येथील खडका फाटा रस्त्यावर मार्केट कमिटी

जवळील एका खाद्य तेल कंपनी मधून कंपनीच्या मालकाच्या मुलाची पैशाची बॅग घराच्या गेट जवळ चोरांनी हिसकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापटीत चोरांनी जवळील बंदुकीतून फायर केल्याची घटना घडली होती.

चोर बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले होते. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या सह डाँग स्कोड पथक व फिंगर प्रिंट्स पथकाने पाहणी केली.

यावेळी समोरील काट्यात बॅग आढळून आली आहे. यानंतर सदरील पैसे असलेली बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेचं पुढील योग्य दिशेने चालू आहे. यावेळी डॉग स्कॉडच्या सहाय्याने संपूर्ण परिसरात शोध मोहीम केली आहे. लवकरचं सदरील गुन्ह्याचा तपास लागेल अशी आहे.