file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  ड्रग्ज सेवन प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानची न्यायालयाने १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून शनिवार, २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात आहे.

आज आर्यनची कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्याला आज मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आर्यनच्या वकीलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती.

मात्र यावर एनसीबीने ११ ऑक्टोंबर पर्यंत कोठडी मागितली होती. मात्र, सुनावणीअखेर न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर ६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणात आणखी तपास गरजेचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. चौकशीच्या आधारावर, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोठडी आवश्यक आहे, असे न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.