अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  जमीन खरेदी-विक्री करत असलेल्या व्यक्तीला दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्यावरून सोनई येथील तीन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime)

याप्रकरणी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र तख्तमल गुगळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात शेटे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनई येथील मार्केट कमिटीच्या ठिकाणी पोपट शेटे यांनी वेळोवेळी कर्ज फसवणूक प्रकरणी दहा लाख रुपये दे, नाहीतर प्रकरण उजेडात आणून देईल,

या भीतीपोटी गुगळे यांनी स्वतःचा व्यवस्थापक अमोल शिंदे यांच्याकडे पाच लाख रुपयांचा धनादेश सचिन पवारकडे दिले, ते पाच लाख रुपये फिर्यादी यांच्या प्लॉटच्या मागच्या बाजूला मार्केट कमिटी येथे दिले.

त्या वेळेस दोन इसम तोंडाला काहीतरी मफलरने बांधून विनानंबर मोटारसायकल वरून येऊन म्हणाले की, प्रकाश भाऊ दिल्लीला आहे, तू त्याचे मिटवणार आहे की नाही,

एकदाच सांग, नाहीतर तुझा कायमचा काटा काढू असे म्हणून 10 लाखांची खंडणी मागितली. या फिर्यादीवरून पोपट शेटे याचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.