अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- जळीतकांड प्रकरणावरून अहमदनदगर येथील जिल्हा रुग्णालय हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यातच आता वेगवेगळ्या संघटना आक्रमक होऊन वेगवेगळ्या मागण्या करताना दिसून येत आहे.

यातच सिव्हिल हॉस्पिटल च्या संरक्षण भिंतीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम चालु आहे संरक्षण भिंतीच्या शेजारी फुटपाथ आहे, तो फूटपाथ संरक्षण भिंतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने तोडला आहे ,या मुळे पालीकेचेही नुकसान झाले आहे .

शहर विद्रुपीकरण करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी केली आहे.

दरम्यान याबाबत गायकवाड यांनी सहाय्यक आयुक्त पठारे यांना निवदेन दिले आहे. या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेने बांधलेला हा फूटपाथ संबंधित ठेकेदाराने तोडण्यासाठी महानगरपालिकेतील परवानगी घेतलेली आहे काय? तसेच सिव्हिल ची संरक्षण भिंत आहे ती अतिशय निकृष्ट दर्जाची बांधत असून ती कोणत्याही क्षणी पडू शकते .

त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा पिपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे मनपा कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.