श्रीरामपूरच्या राजकारणात नवा अध्याय होणार सुरू ! स्वर्गीय जयंत ससाणे यांचे स्वप्न…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती संगीता शिंदे यांच्या सभापती निवडीला डॉ. वंदना मूरकुटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आव्हान दिले होते. त्याचा सोमवारी निकाल झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यमान सभापती शिंदे यांना पंचायत समितीची मुदत संपेपर्यंत अपात्र ठरवले आहे. सन २०१७ मध्ये झालेल्या श्रीरामपूर पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. वंदना मुरकुटे, अरुण पाटील नाईक,विजय शिंदे व संगीता शिंदे असे चार सदस्य विजयी झाले.

सभापती निवडीवेळी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आठ सदस्यीय असणाऱ्या पंचायत समिती मध्ये डॉ. मुरकुटे व संगीता शिंदे या दोन महिला सदस्यांना संधी प्राप्त झाली. त्यावेळी निवडीच्या आधी तालुक्यात एक नवे समीकरण उदयास आले.

काँग्रेसच्या सभापती पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ. मुरकुटे यांना घोषित केले असताना ऐनवेळी संगीता शिंदे यांनी विरोधी सदस्यांची मदत घेऊन सभापतिपद मिळवले. तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी ही निवड प्रतिष्ठेची केली होती.

त्यामुळे शिंदे यांच्या विरोधात पक्ष आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका डॉ. मुरकुटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सभापती शिंदे यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम १९८६ मधील कलम ३(१) (ब) मधील तरतुदीनुसार अपात्र घोषित केले.

त्यामुळे काँग्रेसच्या गटनेत्या डॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. वंदना मुरकुटे यांच्या वतीने ॲड. दत्ता घोडके,व ॲड.समीन बागवान, अॅड. माणिकराव मोरे यांनी काम पाहिले. दरम्यान, जिल्ह्याधिकारी यांनी दिलेला निकाल मान्य करीत आहे. त्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सभापती संगीता शिंदे यांचे पती नाना शिंदे यांनी सांगितले.

स्वर्गीय जयंत ससाणे यांचे स्वप्न… या निकालाचे पूर्ण श्रेय ज्ञानेश्वर मूरकुटे यांना आहे. आपल्याला सभापती होऊ न देण्यासाठी मोठमोठी माणसं झटली होती. मात्र अखेर न्याय मिळाला.आज स्व जयंत ससाणे असते, तर त्यांना खूप आनंद झाला असता.त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करून दाखवू. आपल्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे आदींचे मार्गदर्शन मिळाले. भविष्यात लोकाभिमुख व आदर्श कारभार करून दाखवू.” डॉ वंदना मुरकुटे.

स्वर्गीय जयंत ससाणे यांचे स्वप्न…

या निकालाचे पूर्ण श्रेय ज्ञानेश्वर मूरकुटे यांना आहे. आपल्याला सभापती होऊ न देण्यासाठी मोठमोठी माणसं झटली होती. मात्र अखेर न्याय मिळाला.आज स्व जयंत ससाणे असते, तर त्यांना खूप आनंद झाला असता.

त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करून दाखवू. आपल्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे आदींचे मार्गदर्शन मिळाले. भविष्यात लोकाभिमुख व आदर्श कारभार करून दाखवू.” डॉ वंदना मुरकुटे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!