अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-  रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा पतसंस्थेत ठेवी अडकल्याने संतप्त असलेल्या ठेवीदारांनी चक्क आगळेवेगळे आंदोलन केले. या संतप्त ठेवीदारांनी चक्क पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अर्धनग्न हाेत ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान विशेष बाब म्हणजे रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही.

त्यावर ठेवीदार आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संताप झालेल्या आंदोलकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरच आंदोलनाद्वारे निषेध प्रदर्शन केले.

ठेवीदारांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे एकदिवशीय अर्धनग्न आंशिक उपोषण करून पोलिसांच्या कामकाजावर राेष व्यक्त केला. आर्थिक गुन्हे शाखा हे प्रकरण याेग्य पद्धतीने हाताळत नसल्याचेही आराेप काही ठेवीदारांनी केले.

आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल होवूनही कारवाई होत नाही. अडकलेल्या ठेवी परत मिळत नाहीत. यासाठी प्रशासनाकडे इच्छा मरणाची मागणी करूनही परवानगी दिली जात नाही.

गैरव्यवहार करणारे आणि संचालकांवर राजकीय दबावामुळे कारवाई टाळली जाते, असा आरोपही या आंदोलनकर्त्यांनी केले.