अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  छोटा हत्तीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जखमी झाला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-कोल्हार रस्त्यावर घडली आहे.(Ahmednagar Accident)

याबाबत सविस्तर माहिती अशी, दुचाकी व टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. कोठुळे (पूर्ण नाव माहित नाही) ( ता. राहुरी) हे आपल्या दुचाकीवरून दुपारी तीन वाजेच्या सुमारास जात होते.

त्यावेळी खोसे वस्तीजवळ छोटा हत्ती टेम्पो त्याच्या दुचाकीला धडकुन अपघात घडला. अपघात घडल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला होता.

मदतीसाठी परिसरातील नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी तातडीने येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोल्हार-बेलापूर या रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याच्या कडेला खडी टाकलेली आहे. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.