file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यातच बेलापूरात चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येऊ लागले आहे.

विशेषबाब म्हणजे या चोरटयांनी शेजारी – शेजारी असलेले दोन घरे फोडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर येथील बायपास रोड परिसरात राहणारे विराज उदय खंडागळे व सोमनाथ चिंतामणी यांच्या घरावर चार ते सहा चोरट्यांनी ही चोरी केली.

ही दोन्ही घरे शेजारी आहेत. यात सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले, गंठण व दहा हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. चोरांनी लोखंडी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

यानंतर कुटुंबीयांना शस्त्रांचा धाक दाखवत चोरी केली. चोरटे सुमारे दीड तास घरामध्ये थांबून होते. या दरम्यान चोरट्यांना विरोध करणाऱ्या संतोष चिंतामणी या युवकाला चोरट्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली.

दरम्यान खंडागळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा घायवट घटनेचा तपास करत आहेत. वाढत्या चोऱयांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.