file photo

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी होत असली तरी दुसरीकडे अहमनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढतच आहे.

यामुळे आता प्रशासनाने आक्रमक पाऊले उचलली आहे. नुकतेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे,

तिसगाव मधील सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने १३ ऑक्टोबरपर्यंत तिसगाव येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

तसेच जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे तिसगावचाही त्यात समावेश आहे.

या आदेशाने गावातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तिसगावसह परिसरातील नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळण्याची गरज आहे.