Ahmednagar News:अहमदनगर महापालिकेतील महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आधीच पाच नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले असून आणखी आठ ते दहा नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारी असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेनेतील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नगरसेवक अनिल शिंदे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, महापालिकेतील शिवसेनेचे आणखी आणखी आठ ते दहा नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांनी थोडा वेळ मागितला आहे.

त्यांनी आम्ही तो दिला असून त्यांचा निर्णय लवकरच होईल, अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर महापालिकेत शिवसेनेचे २३ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील पक्ष पक्षांच्या मदतीने शिवसेनेचे रोहिणी शेंडगे महापौर आहेत.

मात्र, शिवसेनेत फूट होऊन आणखी नगरसेवक शिंदे गटात गेले तर महाविकास आघाडीची सत्ता धोक्यात येऊ शकते. आधाची राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनाला नाखुषीनेच पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे येत्या काही काळात नगरमधील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.