Aadhar Card :आधार कार्ड हे जवळपास सर्वच सरकारी तसेच महत्वाच्या खाजगी व्यवहारांसाठी आता आवश्यक झाले आहे. कोणतीही सरकारी योजना असो त्यासाठी आपल्याला आधार कार्डची गरज भासते. अनेक सेवांसाठी ते आपल्याला आवश्यक आहे.

बँकेत खाते उघडण्यापासून ते आपले डीमॅट खाते बनवण्यापर्यंत आपल्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आज आपण त्यासंबंधित महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

अशातच आता आधार कार्डाशिवाय कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळेच आधार कार्डमधील सर्व माहिती अचूक असणे महत्त्वाचे मानले जाते.

जर तुमच्याकडे आधार कार्डमध्ये योग्य तपशील नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, जसे की तुम्हाला सिमकार्ड घ्यायचे असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड साठी देखिल ते महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला बँक खाते उघडायचे लागेल किंवा सबसिडी घ्यायचा विचार आहे किंवा मुलांचे प्रवेश पूर्ण करायचे असतील तर, या सगळ्यासाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

अशातच जर तुमच्याकडे आधार कार्ड बनले असेल आणि तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर बरोबर दिलेला नसेल किंवा अजून नोंदणी केली नसेल, तर तुम्ही घरी बसून तुमचा मोबाईल नंबर टाकून माहिती मिळवू शकता.

आधार कार्डमध्ये मोबाईल क्रमांक बदलण्याचा हा मार्ग आहे
तुम्ही घरी बसून आधार कार्डशी संबंधित ऑनलाइन केलेल्या सर्व कामांची माहिती मिळवू शकता. मात्र आधार कार्डमधील मोबाईल क्रमांक स्वतःहून बदलणे खूप अवघड आहे. यासाठी तुम्हाला जवळच्या आधार कार्ड केंद्राला भेट द्यावी लागेल.

यासाठी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जात असल्याने असे सांगण्यात आले आहे. आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर जोडण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुम्ही जवळच्या केंद्राला भेट देणे महत्त्वाचे मानले जाते.

अशा प्रकारे आधार कार्डचा मोबाईल क्रमांक बदलता येईल

सर्व प्रथम, आपल्याला अधिकृत वेबसाइटला भेट देण्याची आवश्यकता आहे.

यानंतर तुम्ही होम पेजवर Get Aadhar या पर्यायातील Book n Apartment वर क्लिक करू शकता.

यानंतर तुम्ही Process to Book Appointment वर क्लिक करू शकता.

आता तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर, त्याची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे.

यानंतर तुम्ही आधार अपडेटवर क्लिक करू शकता.

तुमचे नाव आणि आधार कार्ड क्रमांक टाकून, तुम्ही मोबाइल नंबर निवडून प्रक्रिया करू शकता.

तुमचा नवीन मोबाईल नंबर टाकणे आणि OTP सह पडताळणी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

त्यानंतर बुक अपॉइंटमेंट या पर्यायावर क्लिक करा.

तुम्हाला आधारवर योग्य पर्याय निवडावा लागेल आणि तुमच्या ॲपॉइंमेंट ची वेळ निवडावी लागेल.

येथे आता UPI नेट बँकिंग क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ₹ 50 चे ऑनलाइन पेमेंट करणे खूप सोपे आहे.