अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. त्यामुळेच नागरिकांना आपल्या बँक खात्यात विविध सरकारी योजनांच्या अनुदानाचा अर्थात सबसिडीचा तसेच इतर सुविधांचा लाभ घेता येतो.

कुठल्याही सरकारी योजनेच्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यकच आहे.

मात्र, आपले आधार कार्ड एकच असले तरी अनेक जणांचे वेगवेगळे मोबाईल नंबर असतात आणि दोन-तीन बँक अकाउंटसुद्धा असतात.

त्यामुळे आपले आधार कार्ड नेमके कोणत्या बँक अकाउंटशी लिंक आहे या बाबत संभ्रम निर्माण होतो. मात्र असे असले तरी आता घरबसल्याला आपले आधार कोणत्या बँक अंकाउटशी? कोणत्या मोबाईल नंबरशी लिंक आहे हे पाहता येणार आहे.

पाहण्यासाठी नेमकं काय करायचं?

१) सुरूवातीला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जायचे.

२) इथे गेल्यानंतर Check Your Aadhaar and Bank Account वर क्लिक करायचे

३) इथे आल्यानतंर आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड टाकावा लागेल.

४) तो टाकल्यानंतर आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल. तो OTP UIDAI वेबसाइटवर टाकायचा.

५) त्यानंतर तिथे लॉगइन ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करायचे. लॉगइन केल्यानंतर आधारशी जोडलेली सर्व बँक अकाउंट्स डिटेल्स आपल्यासमोर दिसतील.

जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड लाॅक करायचे असेल तर ते सुद्धा करता येते. त्यासाठी नेमकं काय करायचे.

१) आधार कार्ड लॉक करण्यासाठी सर्वात आधी आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरुन 1947 वर GETOTP मेसेज लिहून पाठवायचा. मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल.

२) त्यानंतर तुम्हाला पुन्हा 1947 या नंबरवर ‘LOCKUID आधार नंबर’ आणि हा OTP लिहून पाठवायचा. तो पाठवल्यानंतर तुमचं आधार कार्ड लॉक होईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड कोणत्या अकाउंटशी लिंक आहे हे पाहू शकता आणि तुमचे आधार कार्ड सुरक्षतेसाठी लाॅक सुद्धा करू शकता.