Ahmednagar News : राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने आपघात होऊन दोघेजण गंभीर जखमी झालेले. आजूबाजूला गर्दी मात्र मदतीसाठी पुढे कोणी येत नव्हते मात्र या दरम्यान आमदार मोनिका राजळे या त्या दोन जखमीसाठी देवदूतच ठरल्या आहेत.

दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर व एकाची चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील तनपुरवाडी गावाजवळ कल्याण राष्ट्रीय महामार्गावर दिनकर आन्याबा वैरट ( रा.माजलगाव जि. बीड ) व निवृत्त मंडळाधिकारी रामभाऊ यादव बनसोडे (रा.कसबा पाथर्डी ) या दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

यात दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजुला जखमी अवस्थेत पडले होते. दरम्यान रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. त्याच वेळी अकोला येथुन पाथर्डीच्या दिशेने येत असलेल्या आ.राजळे यांनी गर्दी पाहुन थांबुन चौकशी केली असता अपघात झाल्याचे समजले.

ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलाविली होती मात्र ती आली नव्हती. जखमींना उपचाराची तातडीने गरज असल्याचे आ.राजळे यांच्या लक्षात आले. त्यांनी आपला नियोजीत पुढील दौरा अर्धवट सोडून क्षणाचाही विलंब न लावता स्वत:च्या गाडीतुन रुग्णालयात दाखल करण्याची सुचना चालक व स्वीय सहायकास केली.

त्यांनी आ.राजळे यांच्या गाडीतुन जखमींना अवघ्या पाच मिनटात रुग्णालयात दाखल केले.यावेळी आमदार राजळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून तातडीने योग्य ते उपचार करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर दहा मिनटांनी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली तोपर्यंत जखमीवर प्राथमिक उपचार सुरू झाले होते.