Ahmednagar News : शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाजवळ सोमवारी दुपारी एका एसटी बसला अपघात झाला. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

मनमाड -पुणे या एसटी बसला अपघात झाला आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.यामध्ये मोठी दुखापत कोणालाही झालेली नाही. असे असले तरी मोठी दुर्घटना टळली आहे.

अडथळ्यांच्या पलिकडे खोदकाम केलेले आहे. बस आणखी पलीकडे गेली असती तर पलटी होण्याचा धोका होता. बसमधून सुमारे पन्नास प्रवासी प्रवास करीत होते. चालकाला भोवळ आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.

नगर-औरंगाबाद रोडवर अशोका हॉटेलजवळ ही घटना घडली. तेथे पुलाचे काम सुरू असल्याने अडथळे उभारून काम सुरू आहे. तेथून बस नेत असताना चालकाचा अंदाज चुकून बस बाजूच्या अडथळ्यांवर धडकली.

यामध्ये काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत. चालकाला भोवळ आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण चुकले असल्याचा अंदाजही सांगण्यात येत आहे. अधिक तपशील अद्याप उलब्ध झाला नाही.