file photo

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस संगमनेर येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांनी 10 वर्षे कैदेची शिक्षा सुनावली आहे.

सुनील अशोक पवार असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अत्याचार पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील वाघापूर परिसरातून सुनील अशोक पवार (रा. रायते वाघापूर, ता. संगमनेर) याने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले.

आरोपीने राहाता तालुक्यातील चंद्रापूर येथे त्याच्या बहिणीकडे सदर मुलीला घेवून गेला. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान सदर मुलीचे आई-वडील हे पोलिसांत तक्रार देणार असल्याची माहिती आरोपीस मिळाल्याने त्याने सदर मुलीला खराडी येथे मुलीच्या नातेवाईकांकडे आणून सोडले.

त्यानंतर सदर मुलीने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यांनतर सदर खटला संगमनेर येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर चालला. न्यायालयाने आरोपी सुनील अशोक पवार यास वरील शिक्षा सुनावली आहे.