अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कत्तलखान्या प्रकरणी जबाबदार असणार्‍या पोलिस अधिकार्‍यांविरुद्धध निलंबनाची कारवाई करावी,

सराईत गुन्हेगारांना तडीपार करावे या प्रमुख मागण्यासाठी कार्यकर्त्यांनी मंगळवारपासून पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र भाजपचेे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील

यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संगमनेर येथील बेकायदेशीर कत्तल खान्याच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.

या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई होणार असल्याचेे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर दोन दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले

बेमुुुदत ठिय्या आंदोलन तूर्त स्थगीत करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक हे सोमवारी किंवा मंगळवारी संगमनेर येथे येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार आहे.

या चर्चेनंंतरही कारवाई झाली नाही तर आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी कोपरगावचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला. कत्तलखान्याच्या विरोधत कोपरगाव येथेेही आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.