अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- नगर शहरातील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे अकरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर सिव्हिल सर्जन यांच्या कामावर आक्षेप घेण्यात आले.

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तक्रारी केल्या आहेत. त्यातच जिल्हा रुग्णालयात अनीतांडव झालेले आहे.

यामुळे या आगीच्या घटनेसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या कामाची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.

अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत ११ जणांचा जीव गेल्यानंतर शासनाचे डोळे उघडले असून

नगरच्या देशपांडे रुग्णालयासाठी ७ कोटी तर जिल्हा रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेसाठी २ कोटी ५० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांची चौकशी करून कारवाईचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पोखरना यांच्यावर निलंबनाची अथवा सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई करण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ठराव घेऊन आरोग्य मंत्र्यांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ त्यांनी दिली.