अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2022 Krushi news : रशिया आणि युक्रेनमध्ये या दोन देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे त्याचा परिणाम अनेक देशांवर पडत आहेत. युद्धामुळे अनेक देशांमध्ये अन्नधान्याची समस्या उद्भवू लागली आहे.

या दोन देशातून अनेक देशांना खाद्यान्न आयात-निर्यात व्यापार होत होती. तर रशिया सर्वात मोठे खाद्यान्न निर्यातक देश आहे.

पण यावेळी दोन्ही देशातील युद्धामुळे निर्यात बंद असल्यामुळे या देशावर अवलंबून असणार्‍या देशात अन्नधान्याची कमतरता जाणवू लागली आहे.

तर असे सर्व देश भारताकडे खाद्यान्न निर्यात करणारा पर्याय देश म्हणून खाद्यान्नाची मागणी करू लागले आहेत. हेच कारण आहे की, या वेळी भारत एक मुख्य खाद्यान्न निर्यातक देश म्हणून उभारीला येत आहे. या काळात भारताचा खाद्यान्न निर्यात वेगाने वाढत चालला आहे.

देशात यंदा गव्हाचे उत्पादन चांगले भारतात या वर्षी शेतकऱ्यांनी गव्हाच्या उत्पादनासाठी अधिक मेहनत घेतली असल्यामुळे गहू उत्पादन या वर्षी भरपूर प्रमाणात निघाले आहे. तर शेतकऱ्यांनी गव्हाचे अधिक उत्पादन घेऊन केवळ देशातच नाही तर देशाबाहेरील अन्नधान्याचे संकटही दूर केले आहे.

त्यामुळे अनेक देश आपल्या देशातील अन्नधान्याचा तुटवडा बसू नये म्हणून भारताबरोबर गहू निर्यातीचा करार करू लागले आहेत. आज भारताच्‍या उत्‍पादनात स्‍वत:च्‍या सोबत इतर देशांच्‍या खाद्यान्‍नाची निर्यात होत आहे. त्यामुळेच गव्हू उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.

शेतकऱ्यांच्या गव्हाला बाजारभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. रशिया- युक्रेन युद्धा मुळे युनायटेड स्टेट्सने रशिया अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे भारता सहीत अनेक देशात तेल आणि अनेक गोष्टींच्या किंमतीत वाढल्या आहेत. पण भारतात या वर्षी गव्हाचे उत्पादन चांगले झाल्यामुळे भारत अनेक देशांना गावाचे निर्यात करत असल्यामुळे शेतकऱ्यांना गव्हाला बाजार भावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे.

काय आहेत गव्हाचे भाव? या वेळेस बाजारातील गव्हाची वाढती आवक पाहता शेतकऱ्यांना आधीचे दर मिळत आहेत. त्यामुळे गहू बाजारात 2250 ते 2300 रूपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. काही बाजारपेठेमध्ये 100 – 200 रुपयांची चढ उतरण देखील दिसत आहे.

तर भारताने जानेवारी-एप्रिल दरम्यान 60 लाख टन मीट्रिक टन गव्हाची निर्यात केली आहे.तर अजून मागणी लक्षात घेता या वर्षाच्या अखेरपर्यंत 75 ते 80 लाख मेट्रिक टन गव्हाची निर्यात करेल.आणि जो एक रेकॉर्डही होईल.