अहिल्यानगरमध्ये मोहरम सणानिमित्त डीजे वाजवणं भोवलं, डीजे चालकांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

Updated on -

अहिल्यानगर- मोहरम सणानिमित्त शहरातील मंडळासह डीजे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा बंगाली शाह यंग पार्टी आणी मौला फ्रेंड सर्कल यंग पार्टी तर्फे काढण्यात आलेल्या चादर मिरवणुकीत परवानगीनुसार अटींचा भंग करुन प्रचंड आवाजात डीजे वाजवून व घोषणाबाजी करीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा भंग करीत ध्वनीप्रदूषण केल्याची घटना २ जुलै रोजी समोर आली.

या प्रकरणी बाबा बंगाली शाह यंग पार्टी मंडळाचे अध्यक्ष अजहर रेहमान शेख (रा. बाबा बंगाली चौक) व डीजे चालक आसिफ मुख्तार खान (रा. शंभूराजे चौक, बोल्हेगाव) तसेच मौला फ्रेंड सर्कल व यंग पार्टी मंडळाचे अध्यक्ष आवेज तमोजूद्दीन काझी (रा. जुनाबाजार), डीजे चालक वैभव ईश्वर साबळे (रा. घोसपुरी) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिरवणूक संपल्यानंतर पोलिसांनी डीजे जप्त केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!