श्रीगोंदेतील मातब्बर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकांचे गणित बदलणार; आ.पाचपुते यांची राजकीय खेळी

Published on -

मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांचा आज (दि.१५) भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या व तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला.

श्रीगोंदा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुभाषराव काळाने, बेलवंडीचे माजी सरपंच उत्तम डाके तसेच तांदळी दुमालाचे सरपंच संजय निगडे, तांदळी दुमालाचे माजी सरपंच देविदास भोस व मढेवडगाव सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बंडू नामदेव मांडे यांचा आणि बेलवंडी व तांदळी दुमाला येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला असल्याची माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी दिलेल्या वेळेनुसार मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत वरील मान्यवरांचा व अनेक कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला असून यावेळी जिल्ह्यातील व श्रीगोंदा नगर विधानसभेतील सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी व आमदार विक्रम पाचपुते यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला व प्रचंड जयघोषात जाहीर प्रवेश करण्यात आला.भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नेते,

कार्यकर्ते यांचे श्रीगोंदा नगर विधानसभेतील कार्यकर्त्यांच्या वतीने व जनतेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. भविष्यातही असे अनेक नेत्यांचे प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेले आपल्याला दिसतील असे वक्तव्य, आमदार विक्रम पाचपुते यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!