AhmednagarLive24 :अहमदनगर-पुणे रोडवर चास (ता. नगर) शिवारात कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. दिनेश प्रल्हाद धोंडरे (वय 48 रा. पिंपळनेर रोड, बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मिर्झा बेग व संजय धस अपघातात जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. बेग आपल्या सहकार्‍यांसोबत काही कामानिमित्त पुण्याला जात होते. चास शिवारात त्यांच्या गाडीला मंगळवारी सकाळी नऊ वाजता अपघात झाला. या अपघातात तंत्रज्ञ धोंडरे जागीच ठार झाले तर अध्यक्ष डॉ. बेग व धस जखमी झाल्याने त्यांना नगर शहरातील रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.