Selective focus loneliness young asian woman sitting on bedroom floor near the balcony. Depression sadness breaking up asian teenage girl sitting alone hugging knees closing eyes and thinking.; Shutterstock ID 1499701082; Comments: rs.com

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालूक्यातील उत्तर दिशेकडे असणाऱ्या एका गावात एक अल्पवयीन मुलगी आपल्या कुटूंबासह राहत आहे.

अर्जून परदेशी नामक तरूणाने त्या मुलीवर एकाच दिवशी तिन वेळा जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना नूकतीच उघडकीस आली. सदर मुलगी व तिचे नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात चकरा मारत आहेत.

राहुरी तालूका हद्दीत उत्तर दिशेकडे राहुरी फँक्टरी परिसरात इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटूंबासह राहत आहे. सुमारे एक महिना पूर्वी सदर मुलगी रात्री साडेदहा वाजे दरम्यान जेवण उरकल्यानंतर कचरा टाकण्यासाठी घरातून बाहेर गेली होती.

त्यावेळी अर्जून दिपक परदेशी हा पेंटर काम करणारा तरूण त्या मुलीला म्हणाला तूझी आई इथे लपून बसली. माझ्या बरोबर चल. मी दाखवतो. असे म्हणत त्याने त्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने एका रूममध्ये नेले.

त्या ठिकाणी त्याने त्या मुलीचा विनयभंग करून सलग तिन वेळा बलात्कार केला. त्यानंतर तिला चाकू दाखवून सदर प्रकार कोणाला सांगितला तर तूला व तूझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही. असा दम दिला.

असा आरोप सदर मुलगी व तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तरी देखील त्या मुलीने सदर प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. त्यांनी अर्जून परदेशी याला सदर घटनेचा जाब विचारला.

तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी सदर मुलीवर व तिच्या कुटूंबावर गुन्हा दाखल करू नये म्हणून दबाव टाकला. आम्ही स्टॅम्प पेपरवर सर्वकाही लिहून देतो. तूमचा सर्व खर्च देतो.

मुलीला पपई खाऊ घाला. म्हणजे तिला गर्भ राहणार नाही. असे सांगून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती सदर मुलगी व तिच्या नातेवाईकांनी दिली.

त्या घटने नंतर अर्जून दिपक परदेशी हा वारंवार त्या मुलीचा पाठलाग करु लागला. या सर्व प्रकाराला घाबरून आज दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सदर मुलगी व तिच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तसेच मला न्याय मिळावा. अशी हाक सदर मुलीने पोलिस प्रशासनाला दिली आहे. पोलिस प्रशासन सदर मुलीला न्याय मिळवून देणार का? याचीच चर्चा आता संपूर्ण तालूक्यात सुरू आहे.