Breaking news. World news with map backgorund. Breaking news TV concept. Vector stock.

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- ट्रक चालकाने महामार्गावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. या अपघातात योगेश मच्छिंद्र मुरूमकर (वय 30 रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) या तरूण ठार झाला.

अहमदनगर- सोलापूर महामार्गावर रूईछत्तीशी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. दरम्यान याप्रकरणी अंबादास अंकुश मुरूमकर (वय 24 रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश मुरूमकर हे मंगळवारी सकाळी सहा वाजता त्यांच्या दुचाकीवरून बनपिंप्री (ता. श्रीगोंदे) येथून अहमदनगरच्या दिशेने येत होते. याचवेळी अहमदनगरकडून सोलापूरकडे जाणार्‍या ट्रक चालकाने महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात रूईछत्तीशी गावातील जानईवस्तीजवळ दुचाकीला समोरून धडक दिली.

या अपघातात योगेश मुरूमकर हे ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील वाहने ताब्यात घेतली आहे.

याबाबत अंबादास मुरूमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार बी. एम. गांगर्डे पुढील तपास करीत आहेत.