file photo

कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या व्हायरसच्या विळख्यातून आतापर्यंत कोणाचीही सुटका झाली नसल्याचं आपण पाहिलं आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा फटका राज्यातील मंत्र्यांना देखील बसताना दिसत आहे. कालच ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तसेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

त्यातच आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन आजी व एका माजी मंत्र्याला कोरोनाने घेरल्याचे दिसून येत आहे.

बाळासाहेब थोरात यांनी त्याना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच फेसबुक वर दिली आहे त्यात ते म्हणाले ”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही,

तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.