अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- शुक्रवारीरात्री पहाटेच्या सुमारास भिंगार छावणी परिसरात सदर बाजार लगत असलेल्या नेहरू मार्केटला भीषण आग लागली. या आगीत नेहरू मार्केट मधील चोवीस पैकी तब्बल वीस दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत.

दरम्यान या दुर्घटनेमुळे संबंधित दुकानदारांचे मोठे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भिंगारमधील शुक्रवार बाजार पेठेतील नेहरू मार्केटला अचानक आग लागली. या नेहरू मार्केटमधील जवळपास सर्वच दुकानांना भीषण आग लागली.

दुकानांना लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या घरांना देखील आगीने वेढले होते. यावेळी आजूबाजूच्या काही घरांनादेखील आग लागली होती. आगीत दुकानातील फर्निचरसह इतर सामान जळून खाक झाले.

या भीषण आगीत दुकानदारांच्या मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या मदतीने तात्काळ लष्कराच्या वर्कशॉप, अहमदनगर महानगरपालिका तसेच देवळाली प्रवरा येथील अग्निशामक दलाल माहिती देऊन आग विझवण्यात यश आले आहे.

अग्निशामक दलाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली आहे. दरम्यान, आग कशामुळे लागली? याचं कारण अद्याप अस्पष्टच असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.