अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- गाय पिळण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यामध्ये मुलाने वयोवृद्ध असलेल्या जन्मदात्या बापाला बांबूने जबरदस्त मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे दिनांक २७ ऑक्टोबर रोजी घडली.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेतील मयत विठ्ठल तुळशीराम हारदे वय ७२ वर्षे हे राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथे आपल्या कुटूंबासह राहत होते.

त्यांचा मुलगा आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे हा शुल्लक कारणावरून नेहमी भांडणे करीत असे. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास यातील आरोपी ज्ञानेश्वर हारदे हा दारु पिवुन घरी आला होता. त्याचे व त्याची पत्नी सविता यांच्यात गाय पिळण्याच्या कारणावरून वाद चालू होते.

त्यावेळी त्याचे वडील विठ्ठल तुळशीराम हारदे हे आरोपी ज्ञानेश्वर हारदे यास म्हणाले की, तु नेहमीच दारु पित असतो. आणि शुल्लक कारणावरून भांडण करत असतोस. असे म्हणालेचा त्याला राग आल्याने तो त्याचे वडील विठ्ठल हारदे यांना म्हणाला की, तुम्ही नेहमीच माझ्या कामात अडथळा करतात.

आज तुम्हाला संपवुन टाकतो. असे म्हणून जवळच पडलेला बांबू घेवुन विठ्ठल तुळशीराम हारदे यांना बांबुने जबरदस्त मारहाण करुन त्यांचा निर्घृण खूण केला. विठ्ठल हारदे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले.

मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव,

निरज बोकील आदिंसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आरोपीला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले. सर्जेराव महिपती हारदे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे याच्या विरोधात खुणाच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक भागचंद सुर्यवंशी हे करीत आहेत.