AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-गेवराई राज्य महामार्गवरवर राक्षी येथे एसटी बस व ४०७ टेम्पो यांच्यात आज सकाळी दहाच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला

तर एसटी बसच्या चालकाच्या प्रसंगावधान मुळे बसमधील प्रवाशी बालबाल बचावले गेले व मोठा अनर्थ टळला गेला.परंतु पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामस्थांनी तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

शेवगाव- गेवराई राज्यमार्गावर महामंडळाची एसटी बस एम एच ४० या ५५७१ ही नगर- पुसद ही एसटी बस आज सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास शेवगावहुन -गेवराईच्या दिशेने जात असताना

राक्षी ता.शेवगाव नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर चापडगावहुन शेवगावच्या दिशेने जाणारा फळ माल वाहतूक करणारा ४०७ टेम्पो क्रमांक एम.एच.०८ डब्लू. १४७१ यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन टेम्पो चालक जागीच ठार झाला.

तर एसटी बस चालक भोपालसिंग जाणूसिंग पवार रा.पुसद जि. यवतमाळ व बसमधील प्रवासी आकाश भगवान रोठे रा.बीबी ता. लोणार जि.बुलढाणा तसेच नेवासा पंचायत समितीचे कर्मचारी हे अपघातात जबर जखमी झाले आहेत.

वाहक संतोष सीताराम आढाव व इतर प्रवाश्यांना जबर मार लागला आहे. जखमींवर शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.