अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-  ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना तोल सुटल्याने मोठा वाद होवून ग्रामसभा अर्ध्यावर गुंडाळण्याची नामुष्की पदाधिकाऱ्यांवर ओढवली होती.

सभेतील गोंधळानंतर निम्याहुन अधिक ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी यावेळी सामुहीक सभात्याग केला होता . परंतु काही मोजके ग्रामस्थ हाताशी धरून जवळ्यात चार दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी भरवलेल्या प्रति ग्रामभेला उत्तर देणे सत्ताधिकाऱ्यांनी चालूच ठेवले.

त्यामध्ये प्रतिग्राम सभा भरवणारे व त्यांचे पाठीराखे कोण होते त्यांच्याकडे आम्ही पाहुन घेतो . म्हणत प्रतिग्राम सभा भरवणासाठी पुढाकार घेणारे रामदास घावटे यांना यावेळी शिवीगाळ व अपशद्ब वापरून अपमानीत केले.

यावेळी सदर ग्रामसभेचे फेसबूक या समाज माध्यमावर थेट प्रसारण चालूच होते . चार दिवसांपुर्वी घावटे यांनी जवळे गावचा विकास आराखडा तयार करून प्रतिग्रामसभे समोर ठेवला होता.

तसेच सामाजिक हिताचे इतर काही निर्णय घेण्याचे ग्रामसभेला सुचवले होते . यावरून मात्र सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते.

या गावात काय करायचे काय नाही ते आम्हीच ठरवणार असे म्हणतग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार न करता अरेरावी करत भर ग्रामसभेत गोंधळ घालत मनमानी केली होती.

हि बाब मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर पसरल्यामुळे चांगल्या सुचना ग्रामसभेत सुचवणारांचा आवाज दडपल्या प्रकरणी व भावना दुखावल्यामुळे या ग्रामसभेत दडपशाही करणारे माजी सरपंच सुभाष भाऊसाहेब आढाव,

तंटामुक्ती अध्यक्ष, चेअरमन व माजी सरपंच शिवाजी धोंडीबा सालके, उपसरपंच गोरख शिवाजी पठारे या आजी माजी सरपंचा विरोधात भा .द.वी . ५०० ,५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल .

पारनेर पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर , बबनराव कवाद , भानुदास साळवे , सुनिल चौधरी , दत्ता जाधव यांनी दिले होते.