अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Breaking :- संघटित गुन्हेगारी करणाऱ्या दोन कुख्यात टोळ्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) कलमान्वये कारवाई केली होती.

या दोन्ही टोळ्यांच्या विरोधात नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी मोक्का विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही टोळ्यांमध्ये मिळून १० आरोपींचा समावेश आहे.

कुख्यात गुंड विजय राजू पठारे व त्याच्या टोळीतील अजय राजू पठारे, बंडु ऊर्फ सुरज साहेबराव साठे, अनिकेत विजू कुचेकर, प्रशांत ऊर्फ मयुर राजु चावरे, अक्षय गोविंद शिरसाठ (सर्व सिद्धार्थनगर, नगर) या टोळीने तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्चमध्ये दरोड्याचा गुन्हा केला होता.

या टोळीविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात आणखी १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलिसांनी नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पठारे टोळीविरूद्ध मोक्का लावण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली होती.

पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून पठारे टोळीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कुख्यात गुन्हेगार राहुल निर्वाश्या भोसले (वय २२, रा. सारोळा कासार ता. नगर) व त्याच्या टोळीतील उरूस ज्ञानदेव चव्हाण (वय ३३, रा. बुरूडगाव ता. नगर),

दगू बडूद भोसले (वय २७, रा. पडेगाव ता. कोपरगाव), निवाश्या चंदर ऊर्फ सिताराम भोसले (रा. सारोळा कासार) व पप्या मोतीलाल काळे (रा. पैठण ता. जि. पैठण) या टोळीने नगर तालुका पोलिस ठाणे हद्दीत दरोड्याचा गुन्हा केला होता.