अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव येथील पंचायत समितीचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

औरंगाबाद येथील सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथील दिनेश दिलीप दणके( वय-९ वर्षे) कोपरगाव पंचायत समिती जवळ सकाळी ८ वाजता लोखंडी गेटवर खेळत असताना ते गेट अंगावर पडल्याने दिनेश गँभीर जखमी झाला.

त्यास उपचारासाठी कोठारी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वी दिनेशचा मृत्यू झाला. याबाबत डॉ.योगेश कोठारी यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली असून पुढील तपास सहायक फौजदार एस.सी.पवार करीत आहे.