Dead body covered with sheet on murder crime scene

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  अकोले तालुक्यातील वाकी गावाच्या सरहद्दीवर कोल्हार घोटी राज्यमार्गालगत जवळ आलेल्या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर एका अज्ञात व्यक्तीचा चेहरा जळालेल्या अवस्थेतील नग्न मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडवून दिली.(Ahmednagar Breaking)

या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे करताना संबंधित मृतदेहाचा चेहराच जाळून टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले.

हा मृतदेह नग्न अवस्थेत फेकून देण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रोडवर वारंघुशी व वाकी गावाच्या सरहद्दीवर अंदाजे ३५ वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

सदर मृतदेह पुर्णपणे कपडे विरहीत असून सदर व्यक्तीचे केस व चेहरा जाळण्याचा प्रयत्न दिसून येतो. घटना स्थळावरून काही फुटांवर चारचाकी वाहनाच्या खुणा आढळून येतात. पोलीसांना घटनास्थळावर दोनशे रुपयांची एक नोट मिळून व काही अंतरावर मद्याची बाटलीही सापडली.

या घटनेची माहीती वाकी गावचे पोलिस पाटील सोमनाथ सगभोर यांनी राजूर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे व अकोल्याचे उपनिरीक्षक भूषण हंडोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

आढळून येतात. पोलीसांना घटनास्थळावर दोनशे रुपयांची एक नोट मिळून व काही अंतरावर मद्याची बाटलीही सापडली. या घटनेची माहीती वाकी गावचे पोलिस पाटील सोमनाथ सगभोर यांनी राजूर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे व अकोल्याचे उपनिरीक्षक भूषण हंडोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह पुर्णपणे कपडे विरहीत असून सदर व्यक्तीचे केस व चेहरा जाळण्याचा प्रयत्न दिसून येतो.