अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- राहता तालुक्यातील वाकडी गावांमधील खंडोबा मंदिराच्याजवळ असलेल्या विहिरीत एका महिलेचे प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सुजेता प्रकाश सुनार, वय 22 वर्ष, राहणार -वाकडी,तालुका -राहता (मुळ गाव -जिल्हा रकुम, नेपाळ) हि महिला बाथरूमला जाते असे सांगून घराबाहेर गेली.

परंतु परत घरी आलीच नाही.त्यानंतर काल सकाळच्या सुमारास तिचे प्रेत खंडोबा मंदिराच्या जवळील विहिरीत आढळून आले.याप्रकरणी श्रीरामपूर शहरातील साखर कामगार हॉस्पिटल येथील तिचे प्रेत आणण्यात आले होते.

त्यानुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु क्रमांक 68 दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आडागळे पुढील तपास करीत आहेत.