file photo

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- आरोग्यसंगमनेर तालुक्यातील पिप्रींलौकी येथील शेतकरी भाऊसाहेब किसन गिते यांनी शेती व पाण्याच्या वादातून झाडाला गळफास घेऊन रविवारी आत्महत्या केली.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणावर आश्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली. शेत जमिनीचे वाटप व सामायिक विहिरीच्या पाण्याचा वापरामुळे मानसिक त्रास,

मारहाण व शिविगाळ या त्रासाला कंटाळून गिते यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद संदीप गीते यांनी आश्वी पोलिसात दिली. सोमनाथ किसन गिते,

तानाजी किसन गिते, गौरव सोमनाथ गिते (अटक), मनीषा सोमनाथ गिते, स्वाती तानाजी गिते (पिप्रींलौकी) आदींवर गुन्हा दाखल केला.