Breaking news. World news with map backgorund. Breaking news TV concept. Vector stock.

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये शुक्रवारी ही घटना घडली. रोहिणी प्रशांत बुऱ्हाडे (वय 27) असे मयत विवाहितेचे नाव आहे.(Ahmednagar Crime)

रवींद्र भिमाशंकर डहाळे (रा. शेवगाव) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह प्रशांत संतोष बुऱ्हाडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांच्याशी झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांनी रोहिणीचा विविध कारणांसाठी छळ सुरू केला.

या छळाला कंटाळून रोहिणी हिने शुक्रवारी गुलमोहर रस्त्यावरील राहत्या घरात आत्महत्या केली. रवींद्र डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात प्रशांत डहाळे (पती), संतोष (सासरा) आणि सुनिता (सासू) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.