file photo

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :-  मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बिबट्याने जबड्यात पकडून चालवलेल्या माई जनक वैद्य या दीड वर्षीय बालिकेची सुटका करण्यात आली.

यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना सुगाव खुर्द येथे घडली. तिच्यावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दोन दिवस मृत्यूशी झुंज देत गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान तीची प्राणज्योत मालवली.

घरासमोरील ओट्यावर खेळत असताना अचानक बाजूच्या ऊसातून आलेल्या बिबट्याने बालिकेवर झडप घातली, हे दृश्य पाहून तेथील माईच्या बहिणीने आरडाओरडा केला.

तिचे आजोबा व घरातील लोक बिबट्याच्या मागे धावले. त्यामुळे बिबट्याने मुलीला जबड्यातून तेथेच टाकून बाजूच्या उसात पळ काढला होता.

गुरुवारी उपचारादरम्यान जखमी बालिकेसचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने सुगाव खुर्द पंचक्रोशीत शोककळा पसरली.