file photo

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील आदिवासीबहूल भागातील मान्हेरे येथील पांडू शंकर गंभाले यांच्या शेतातील विहिरीत विवाहिता गंगुबाई यशवंत गभाले (३१) व विवाहितेचा मुलगा ज्ञानेश्वर यशवंत गभाले (५) या माय-लेकाराचा बुडून मृत्यू झाला.

अकोले तालुक्यातील मान्हेरे गावच्या शिवारात पांडू शंकर गंभाले यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यात गंगुबाई यशवंत गभाले व ज्ञानेश्वर यशवंत गभाले या माय-लेकराचा पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खबर राजूर येथील देशमुखवाडीचे मारुती गोगा देशमुख यांनी राजूर पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच राजूर पोलिस घटनास्थळी हजर झाले. पण विहिरीत खूप पाणी असल्यामुळे मृतदेह पुण्यातून बाहेर काढणे आवघड झाले.

यामुळे दोन विद्युतपंपाच्या सहाय्याने पाणी उपसण्यात आल्यावर दुपारनंतर मायलेकाचे मुतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात येऊन प्रवरानगर रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

ही आत्महत्या आहे की घातपात हे शवविच्छेदनानंतर अहवाल आल्यावर समजणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेने परिससरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.