अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- नगर-मनमाड मार्गावरील गुहा गावाजवळील माऊली दुध शितकरण केंद्रा समोर रवीवार दि 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा.एका टेंम्पोचे टायर फुटल्याने दुसरा टेंम्पो येवून पाठीमागुन धडकल्याने दोन टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात 6 मजुरा सह 6 लहान मुले असे एकुण 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना उपचारासाठी लोणी येथिल प्रवरा रुग्णालयात दाखल केले आहे. नगरकडून कोल्हारच्या दिशेने टाटा एक टेम्पो जात असताना पुढे चाललेल्या टेंम्पोचा टायर फुटल्याने आयशर व टाटा एस टेम्पो मध्ये जोराची धडक झाली.हा अपघात गुहा गावाजवळील माऊली दुध शितकरण केंद्रा समोर झाला आहे.

या अपघातात टेम्पो मध्ये असलेले नांदगाव(जी.नाशिक) येथील 6 मजूर तर 6 मुले असे एकुण 12 जण जखमी झाले.त्यांना देवळाली प्रवरा येथिल साई प्रतिष्ठान रुग्णवाहिकेचे रवी देवगिरे यांनी प्राथमिक उपचारासाठी विवेकानंद नर्सिंग होम मध्ये दाखल केले.

परंतु सर्व जखमींना गंभीर स्वरुपात मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेले निकीता पांडू वाघ ,उमेश पवार,

सुरेश बापू वाघ (वय20),मंगल सुरेश वाघ (वय 13),रोहित अशोक वाघ (वय 5),संगिता अशोक वाघ (वय 45),कृष्णा गोविंद वाघ (वय 35),ललिता अंकुश पवार (वय 10),

अनिता वाघ (वय 13),इंदु गोविंद वाघ (वय 14),रोहित लक्ष्मण दिवे (वय 14),मच्छींद्र पांडुरंग वाघ (वय 14)आदी जखमी नांदगाव ता.नाशिक येथे मोलमजुरीच्या कामासाठी चालले होते.राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.