अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- रस्त्याने पायी जाणार्‍या पादचार्‍यास कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. भगवान नाथ कार्ले (वय 40 रा. शेंडी ता. नगर) असे मयत पादचार्‍याचे नाव आहे.

बाह्यवळण रस्त्यावर शेंडी शिवारात हा अपघात झाला. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्ले हे शेंडी शिवारातील बाह्यवळण रस्त्याने जात होते. त्यांना पाठीमागील बाजुने स्विफ्ट डिझायर वरील चालकाने जोराची धडक दिली. या अपघातात कार्ले जखमी झाले होते.

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा आदित्य याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार चालक योगेश नामदेव उंडे याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक आव्हाड पुढील तपास करीत आहेत.