अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- तालुक्यातील अरणगाव येथील चौकात झेंडा लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाले. यावेळी जमलेल्या जमावाने एकमेकांवर दगडफेक केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली आहे.

पोलीस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहेत. याबाबत समाज माध्यमांवर कोणीही अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध सायबर ॲक्टनुसार कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

नगर तालुका पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यापैकी काही जणांना ताब्यात घेतले आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.