अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचार, अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे मोकाटे याच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या तरूणीने मोकाटेविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा तपास अहमदनगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर मोकाटे पसार झाला आहे. त्याने जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

न्यायाधीश अमित शेटे यांच्या न्यायालयासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. एम. व्ही. दिवाणे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद मान्य करीत मोकाटेचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.