अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील गंगापूर शिवारातील माळेवाडी भागात रविवारी (दि. ५) रोजी घडली आहे.जालिंदर गोविंद भुजबळ (वय ४१) असे त्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, जालिंदर भुजबळ (वय ४१) याने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जालिंदर यास बाहेर काढले.

एका रुग्णवाहकेद्वारे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत जालिंदर याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परिवार आहे. जालिंदर भुजबळ यांच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे.