अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील खेड जवळ अंबेराई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे वर्ग आहेत त्या शाळेत २८ विद्यार्थी आहेत. त्यासाठी दोन शिक्षक अपेक्षित आहेत.

परंतु तात्पुरत्या स्वरूपात बदली केलेल्या आदेशात २४ विद्यार्थी संख्या दाखविण्यात आली असून एका शिक्षकाची बदली करण्यात आली आहे.

एकाच शिक्षकावर अध्यापनाचा भार आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने युक्रांद व ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी शाळेला कुलूप लावण्यात आले आहे.

जोपर्यंत शाळेत दुसरा शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. कुलूप लावल्यानंतर ग्रामस्थांची बैठक झाली. एक शिक्षकावर शिकविण्याचा भरपूर ताण येतो.

विद्यार्थी चांगल्या दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात. विद्यर्थ्यांची हि परवड होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी दोन शिक्षकांची मागणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टाळे खोलणार नाही.

मागणी होण्यासाठी १० जानेवारीला गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्तीत युक्रांदचे कमलाकर शेटे,

विलास नलगे, प्रवीण साळुंके, विलास दातीर, विजय पावणे, संदीप मोरे, पोपट दातीर, सचिन नलगे, मोहन शेटे, दिपक मोरे, सर्जेराव शेटे, रवींद्र शेटे, सुनील मासाळ, सचिन मोरे, अमित नलगे यांनी शाळेला टाळे ठोकले.